आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुबलक जागा:अकरावीच्या प्रवेशासाठी जिल्ह्यात मुबलक जागा ; विज्ञान शाखेकडे ओढा, कला शाखेत सर्वाधिक जागा

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात दहावीच्या विद्यार्थ्यांनी चांगली कामगिरी केली. त्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्यासाठी मुबलक जागा आहेत. अकरावी अथवा तत्सम शाखेत प्रवेश घेण्यासाठी २२ हजार ३६० जागा रिक्त उसून २१ हजार ३४७ जण उत्तीर्ण झाले. त्यामुळे एक हजार जागा शिल्लक राहणार आहे. त्यात विद्यार्थ्यांचा विज्ञान शाखेकडे ओढा असल्याने याच शाखेत ओढाताण होण्याची शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दहावीचा निकाल कमी लागला. विद्यार्थ्यांनी अधिक टक्केवारी मिळवली आहे. या घवघवीत यशाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहेत. यंदाच्या निकालात मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या अधिक असली तरी, नापास होणाऱ्यांमध्येही मुलांचाच अधिक समावेश असल्याचे चित्र आहे. दहावी साठी एकूण २२ हजार २२५ जणांनी अर्ज भरले होते. त्यापैकी २१ हजार ८१७ जणांनी परीक्षा दिली. त्यापैकी २१ हजार ३४७ विद्यार्थी पास होऊ शकले. यात मुलांची संख्या ११ हजार ९६५ तर मुली ९८५२ यांनी परीक्षा दिली. त्यापैकी ११ हजार ६४० मुलं तर ९ हजार ७०७ मुली पास झाल्या आहेत. या विद्यार्थ्यांना पुढे शिक्षण घेण्यासाठी तिन्ही शाखेत प्रवेश क्षमतेची माहिती घेतली असता पास विद्यार्थ्यांच्या तुलनेत क्षमता अधिक असल्याचे दिसून आले. त्यामुळे मुलांची प्रवेश घेण्यासाठी परवड होणार नसल्याचे समोर आले. त्यातही जिल्ह्यातील अनेक जण इतर जिल्ह्यात शिक्षण घेण्यासाठी जाणार असल्याने अनेक जागा रिक्त राहण्याचे संकेत मिळत आहेत.

विज्ञान शाखेकडे जास्त ओढा विद्यार्थ्यांचा पास होण्याचा टक्का अधिक असल्याने त्यांच्यासह पालकांचाही ओढा विज्ञान शाखेकडे जास्त आहे. मात्र, विज्ञान शाखेची क्षमता केवळ आठ हजार असल्याने काही प्रमाणात ही शाखा हाऊस फुल्ल होण्याचे अथवा टक्केवारी नुसार येथे प्रवेश होऊ शकते, असे संकेतही मिळत आहेत.

बातम्या आणखी आहेत...