आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण:तांबेवाडी येथे रस्त्याअभावी शालेय विद्यार्थ्यांचे हाल ; तांबेवाडी हद्दीतील शेतकऱ्यांनी रस्ता अडविला

भूम14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील तांबेवाडी येथील रस्त्या अभावी शालेय विद्यार्थ्यासह, शेतकरी नागरिकांचे हाल होत आहेत. हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून रस्ता निर्माण करण्यासाठी तांबेवाडी येथील अरुण भिमराव शिंदे हे अनेक वर्षा पासून तहसिल कार्यालयाकडे पाठपुरावा करत आहेत. परंतु तांबेवाडी हाद्दीतील अतिक्रमण मुक्त अद्यापही झालेला नसल्याने शालेय विद्यार्थ्यांसह नागरिक, शेतकरी यांचे हाल होत आहेत. तांबेवाडी येथील शेतकरी औदुबंर महाजन व राणी महाजन हे पती पत्नी दिव्यांग असल्याने या मार्गावरून शेतात ये-जा करताना यांना मोठी कसरत करावी लागत आहे.

सध्या पावसाळा सुरु असल्याने ग्रामस्थांसह विद्यार्थ्यांना रस्त्यावरून ये -जा करताना प्रचंड हाल सोसावे लागत आहेत. हा मार्ग नकाशात देखील आहे. यामार्गावरी ६०० मिटर रस्ता शासनाकडून मंजूर असून त्याला निधी देखील उपलब्ध झालेला आहे. परंतु रस्त्यावर अतिक्रमण असल्याने काम करण्यास अडचण निर्माण होत असल्याचे अरुण शिंदे, पोपट महाजन, धनंजय काकडे, राहूल सक्राते या ग्रामस्थांनी सांगितले. तहसिल प्रशासनाने तांबेवाडी - खडकलगांव - मार्गे बार्शी हा रस्ता अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. लोक प्रतिनीधीनी याकडे लक्ष घालण्याची मागणी केली आहे. शिवाय या मार्गावर दिवेही नाहीत. रात्री अपरात्री कोणी गंभीर आजारी पडले तर काय करायचे याचा विचारही करवत नाही. या रस्त्याचा तातडीने मार्गी लागणे गरजेचे आहे.

बातम्या आणखी आहेत...