आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचे परिणाम:‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ योजनेची अनाथ बालकांना दरमहा मदत ; जिल्हाधिकारी दिवेगावकर यांचे करिअरबाबत मार्गदर्शन

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना महामारीमुळे अनेक परिवारांनी आपले आधारस्तंभ गमावले आहेत. त्यानंतर ज्या संघर्षाचा सामना आपण केला आहे. त्याचे कौतुक जगभरातून होत आहे. भारताने या महामारीवर उपाय म्हणून लस तयार केली आणि पूर्ण जगाला त्याचा पुरवठा केला. याप्रमाणेच कोविडमुळे अनाथ झालेल्या बालकांनी आपल्यावर आलेल्या संकटाचे संधीत रूपांतरण करून जगाला जगण्याचे योग्य उदाहरण दाखवावे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केले. नवी दिल्ली येथून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशभरातील महिला व बालविकास विभागाच्या पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन या कार्यक्रमांतर्गत श्री. मोदी बोलत होते. कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांसाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या निराधार बालकांना दरमहा ४ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. कोरोना काळात पालक गमावलेल्या निराधार मुलांसाठी मोठी भेट दिली आहे. ‘पीएम केअर्स फॉर चिल्ड्रन’ ही नवी योजना नुकतीच सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोरोनामुळे पालक गमावलेल्या अनाथ मुलांना शिष्यवृत्ती आणि आरोग्य कार्ड दिले जाणार आहे. पालकांच्या नसण्याने या मुलांना शिक्षण घेताना आर्थिक अडचणी येऊ शकतात. त्यांना शालेय शिक्षण पूर्ण करता यावं यासाठी १८-२३ वर्षे वयोगटातील तरुणांना दरमहा स्टायपेंड मिळेल आणि ही मुलं जेव्हा २३ वर्षांची होतील तेव्हा त्यांना १० लाख रुपये मिळतील. यासोबतच पीएम केअर्स फॉर चिल्ड्रनच्या माध्यमातून आयुष्मान हेल्थ कार्ड देखील दिले जाणार आहे. यातून या मुलांना ५ लाखांपर्यंतची उपचारांसाठी मोफत सुविधाही मिळणार असल्याची माहिती यावेळी देण्यात अाली. जिल्हाधिकारी यांनी साधला मुला-मुलींशी सवांद प्रधानमंत्री यांच्या ऑनलाइन कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेले दोन्ही पालक गमावलेले मुला-मुलींशी संवाद साधला. या मुलांच्या करिअर आणि शिक्षणाबद्दल श्री. दिवेगावकर यांनी मोलाचा सल्ला दिला. जिल्हाधिकारी यांनी या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण घेण्याचे आवाहन केले. तसेच मोठी स्वप्ने बघा असेही यावेळी सांगितले. यावेळी श्री दिवेगावकर यांच्या हस्ते या बालकांना किट देण्यात आली. यामध्ये हेल्थ कार्ड, बँक पासबुक प्रधानमंत्री यांचे पत्र आणि एक स्नेह पत्र भेट म्हणून देण्यात आले. या कार्यक्रमास अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.व्ही.अंकुश, बाल न्याय मंडळाचे अश्रुबा कदम, श्रीमती धावणे-देशमुख, नंदकिशोर कोळगे, जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयातील प्रज्ञा बनसोडे, हर्षवर्धन शेलमोहक, कोमल धनवडे आदी उपस्थित होते. या प्रसंगी करियर गाईडन्स आणि शिक्षणा बद्दल कौन्सलिंगचा मेळावा आयोजित करण्याबाबत सूचनाही केल्या.

बातम्या आणखी आहेत...