आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएनजीओ बोधी ट्री एज्युकेशन फांऊडेशन महराष्ट्र राज्य यांच्या वतीने गागाभाट सभागृह एमजीएम, औरंगाबाद येथे आयोजित कार्यक्रमात उस्मानाबाद येथील उपक्रमशील शिक्षिका तसेच साहित्यिक कवयित्री आश्विनी धाट यांना बोधी एज्युकेशन फांऊडेशन राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून औरंगाबाद शिक्षण विभागाचे उपसंचालक अनिल सांबळे,आरोग्य उपसंचालक धीरज खरोडकर,आत्माराम बोराडे,डाॅ प्रविण चाबुकस्वार,जीवाची होतीया काहिली फेम अभिनेत्री प्रतिक्षा शिवणकर,बोधी एज्युकेशन फांऊडेशनचे अध्यक्ष रामदास वाघमारे,सचिव मीरा वाघमारे आदि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी त्यांनामानाचा फेटा, शाल आकर्षक मानपत्र जीवन गौरव विशेषांक देऊन गौरविण्यात आले. आश्विनी धाट यांना हा पुरस्कार त्याच्या शैक्षणिक तसेचं साहित्यिक कार्यासाठी देण्यात आला आहे. आश्विनी धाट या शहरातील अभिनव इंग्लिश स्कूल येथे सहशिक्षिका म्हणून कार्यरत असून एक कवयित्री तसेचं लेखिका आहेत. त्यांचा किनारा हा काव्यसंग्रह प्रकाशित असून विविध दैनिकातून लेखन करतात. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, हिरकणी रत्न पुरस्कार,मराठवाडा भूषण,महाराष्ट्र गौरव, एकता गौरव डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्णन पुरस्कार अशा अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.