आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावना दुखावतील असे देखावे उभारू नये अशा सुचना:गणेशोत्सव मंडळांना पोलिसांचे आवाहन

तुळजापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सवात आक्षेपार्ह पोस्ट तसेच इतर धर्मियांच्या भावना दुखावतील असे देखावे टाळून गणेश मंडळांनी सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद यांनी केले आहे. श्री गणेश मूर्ती, देखावे, सजावट हे पर्यावरण पूरक असावेत आदी सूचना काशिद यांनी यावेळी केल्या. गणेशोत्सवा निमित्त पोलिस संकुल येथे शहर तसेच ग्रामीण भागातील गणेश मंडळाचे पदाधिकारी, शांतता समितीचे सदस्य, मोहल्ला कमिटीचे सदस्य, पोलिस मित्र, पोलिस पाटील आदींच्या बैठकीत पोलीस निरीक्षक आजिनाथ काशिद बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, नगर पालिकेचे वैभव पाठक, नायब तहसीलदार पाटील आदींची उपस्थिती होती.

पुढे बोलताना काशिद यांनी गणेशोत्सवात आक्षेपार्ह पोस्ट, गाणे, घोषणा देऊ नये तसेच इतर जाती धर्माच्या भावना दुखावतील असे देखावे उभारू नये अशा सुचना केल्या. तसेच गणेश मूर्ती जवळ जुगार खेळू नये किंवा अवैध कृत्य करू नये आदी सुचना केल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक पल्लवी पवार यांनी तर आभार पोलीस काॅन्स्टेबल रवी भागवत यांनी केले.

रहदारीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी मंडप
गणेशोत्सवा साठी चा मंडप रहदारीस तसेच वाहतुकीस अडथळा होणार नाही अशा ठिकाणी उभारण्यात यावे, वीज वितरण मंडळाकडून अधिकृत विद्युत कनेक्शन घेण्यात यावे, आदी सुचना करत महाराष्ट्र शासनाचा पर्यावरण पूरक गणेश उत्सवात सहभागी होण्याचे आवाहन काशिद यांनी यावेळी बोलताना केले.

बातम्या आणखी आहेत...