आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान:राज्यातील पोलीस पाटील कृती समिती 20 डिसें.ला  विधान भवनावर धडकणार

उमरगा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र पोलीस पाटील कृती समितीची नुकतीच तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक झाली. बैठकीत राज्यातील पोलीस पाटील यांच्या न्याय हक्क मागण्यावर चर्चा करून एकमताने २० डिसेंबरला नागपूर हिवाळी अधिवेशनात विधान भवनावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कृती समितीचे बैठकीला न्यू महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ पाटील, पोलीस पाटील संघटना अध्यक्ष दीपकबाबू पालीवाल, दिलीपआबा पाटील, प्रवीण राक्षे, अंकुश उंदरे, रावसाहेब टेळे, पी डी जहागीरदार, या संघटनांच्या अध्यक्षांनी सहभाग नोंदविला.

या बैठकीचे आयोजन पोलीस पाटील विचारमंच परिवाराचे महेशंकर पाटील, प्रमोद माळी, जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोळेकर यांनी केले होते. बैठकीस सीमाताई वारघडे- पाटील वाघोली, दीपक गिरी- वाई, दिलीप परिहार -परांडा, ज्ञानेश्वर पाटील- सांगली, विजयकुमार मोरे जिल्हा संघटक उस्मानाबाद, बसवेश्वर सांगवे- तुळजापूर तालुकाध्यक्ष, रजनीकांत भुसारे -तुळजापूर,प्रवीण जानराव यासह सातारा, रायगड, सोलापूर, सांगली जिल्ह्यासह राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते. महेशंकर पाटील यांनी प्रास्ताविक केले तर आण्णासाहेब कोळेकर यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...