आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका गुन्ह्यामध्ये अटक करून कोठडीत न ठेवणे व आरोपपत्र न पाठवण्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती २० हजार रुपये स्विकारताना लोहारा पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी गोरोबा बाबासाहेब इंगळे यास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.
गुरुवारी सकाळी १०.५५ वाजता लोहारा ते जेवळी रोडवर एचपी पेट्रोल पंपाजवळ ही कारवाई करण्यात आली असून लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार एका प्रकरणात तक्रारदार ३० वर्षीय तरुणाविरुद्ध लोहारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्याला अटक न करणे, पोलिस कोठडीमध्ये न टाकणे, आरोपपत्र न पाठवणे याकरिता लोहारा पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक गोरोबा इंगळे याने सदरील तरुणाकडे ३ ऑगस्ट २०२२ रोजी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.
तडजोडीअंती २० हजार रुपयांची मागणी करून गुरुवारी (दि.४) लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले. औरंगाबाद विभागाचे लाचलुचपत प्रतिबंधक पोलिस अधीक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक प्रशांत संपते, पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले, विष्णू बेळे, जाकेर काझी यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.