आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन्ही अड्डे उद्ध्वस्त:पारगाव येथे अवैध दारू विक्रीवर पोलिसांचा छापा

पारगाव5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाशी तालुक्यातील पारगाव येथे शनिवारी ( दि. १२) पहाटे सहा वाजता वाशी पोलिसांनी छापा टाकून ३५ हजार ६०० रुपयांची गावठी दारू व रसायन जप्त केले.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विलास माणिक पवार व अरूण माणिक पवार (दोघेही रा. पारगाव) अवैधरीत्या गावठी दारू बनवून विक्री करत होते. पोलिसांनी दारू बनवणाऱ्या अड्ड्यावर छापा टाकून दोन्ही अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले.

यावेळी हजर असलेल्या गावातील काही दारू बनवणाऱ्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस निरीक्षक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार राजू लाटे करत आहेत. पथकात पोलिस नायक यादव, सुरवसे, राऊत यांचा समावेश होता.

बातम्या आणखी आहेत...