आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समुपदेशन:भाळवणी येथील बालविवाह पोलिसांनी रोखला ; अल्पवयीन मुलीला बालसुधारगृहात दाखल

मंगळवेढा5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा भाळवणी येथे होणारा बालविवाह मंगळवेढा पोलिसांनी रोखून सदर मुलीच्या आई वडीलांचे व मुलीचे समुपदेशन करून त्या अल्पवयीन मुलीला सोलापूर येथील बालसुधारगृहात दाखल करण्यात आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे. या घटनेची सविस्तर माहिती अशी,सोलापूर ग्रामीणच्या नियंत्रण कक्षाकडून दि.७ नोव्हेंबर रोजी सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मंगळवेढा पोलिसांना फोन आला, भाळवणी येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह होणार असून तो तात्काळ रोखून कारवाईचे आदेश दिले होते, मंगळवेढयाच्या डी.वाय.एस.पी.राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी तात्काळ पोलीस हवालदार महेश कोळी पो.ह. योगेश नवले पोकॉ .सोमनाथ माने यांना तात्काळ घटनास्थळी पाठवले.

तेव्हा पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील एका सज्ञान मुलाशी भाळवणी येथील शेतातील वस्तीवर बालविवाह करण्याची तयारी सुुरू होती. पोलीस हजर झाल्याचे लक्षात आल्याने, नवरदेवाकडचे नातेवाईक बालविवाहाच्या ठिकाणी न येता परस्पर निघून गेले. पोलिसांनी मुलीस मुलीच्या आईवडील यांना मंगळवेढा पोलिस ठाण्यात हजर केले.

तसेच मुलीच्या वयाबाबत खात्री करून पोलिस निरिक्षक माने यांनी मुलीच्या आई वडीलांना कायदयाबाबत जनजागृती करून त्यांचे मन परिवर्तन केले.व १८ वर्षे पुर्ण झाल्याशिवाय लग्न करणार नाही असा लेखी जबाब मुलीचे आई वडील व स्वतः मुलीचा देखील लिहून घेतला.त्यानंतर अल्पवयीन मुलगी व तिचे आई वडील यांना सोलापूर येथील बालकल्याण समितीच्या अध्यक्षाकडे पुढील कारवाई करिता पाठविले आहे.

नूतन पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी जिल्ह्यात कोठेही बालविवाह होणार नाही, अशा सक्त सूचना दिलेल्या, असताना देखील मंगळवेढा तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे ,याबाबत स्थानिक पातळीवर लोकांचे जनजागरण करणे गरजेचे असल्याची गरज प्रशासनाने व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...