आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकळंब तालुक्यातील येरमाळा व उपळाई येथील दोन विविध चाेरीचे गुन्ह्यांचा तपास लावून चोरांच्या मुसक्या आवळण्यात येरमाळा पोलिसांना यश आले. माहितीनुसार गेल्यावर्षी २२ जून रोजी रात्री ८.१५ वाजता येडेश्वरी मंदिराहून लक्ष्मी बारकुल या त्यांच्या नातेवाइकांसह दुचाकीने येरमाळ्याकडे येत असता एका दुचाकीवरील तीन इसमांनी दुचाकी आडवी लावत दुचाकी थांबवली. चाकूने मारहान करून गळ्यातील मणी मंगळसूत्र, दोन कानातील व एक सोन्याचे फुल जबरीने चोरून नेली होती.
दुसऱ्या घटनेत येरमाळा पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उपळाई येथे लॉकडाउन व मागील आठ महिन्यापूर्वी असे दोन वेळेस शाळेतील एका वर्गाचे कुलूप तोडुन विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी लावलेली एलइडी टिव्ही चोरुन नेली. येरमाळा पोलिस पथकाने खामकरवाडी येथील अनिल ऊर्फ रोडी आता काळे यास ताब्यात घेत गुन्ह्यातील जबरीने चोरून नेलेले सोन्याचे दागिन्यांपैकी दोन सोन्याचे डोरले व १४ सोन्याची दागिने असे जप्त केले. उपळाई येथील अंकुश दिगंबर काळे ( २६ ) यास ताब्यात घेत दोन एलएडी टिव्ही व एक रिमोट असा एकूण ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन दोघांनाही अटक केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.