आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉजवर वेश्या व्यवसाय:उमरग्यात तीन लॉजवर पोलिस पथकांचे छापे, 13 जणांवर गुन्हा

उमरगा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय महामार्गावरील जकेकुर चौरस्ता येथील दोन तर उमरग्यात आरोग्यनगरीतील एक अशा तीन लॉजवर पोलिसांच्या तीन स्वतंत्र पथकाने सोमवारी रात्री छापे मारून वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला. १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून या ठिकाणी चार पीडित महिला आढळल्या. शिवाय मोबाइल व रोख रक्कमही जप्त करण्यात आली आहे.

सहायक पोलिस अधीक्षक एम. रमेश यांना गुप्त माहितीवरुन उमरगा पोलिस ठाण्यात उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कारवाईसाठी तीन पथक तयार केले. बनावट ग्राहक पाठवून कारवाई केली. उमरगा शहरातील आरोग्यनगर येथील सुहाना लॉजवरील कारवाईत पांडुरंग महादेव गायकवाड (रा. जकेकुर), शंकर अनिल बिराजदार (रा. संभाजीनगर, उमरगा), ऑटोरिक्षाचालक नवनाथ मारोती पुरी (रा. पतंगे रोड), लॉज मालक मुजाहीद बागवान (रा. गुलबर्गा) यांनी पीडित महिलेस लॉजवर बोलावून वेश्या व्यवसाय केला.

या प्रकरणी एपीआय रमेश जाधवर यांनी फिर्याद दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी बरकते तपास करत आहेत. जकेकूर-चौरस्ता येथील हॉटेल अभिराज लॉज येथील कारवाईत सूर्यकांत सिध्दारूढ मसुंदे (रा. शरणनगर, आळंद ) श्रीशैल्य निजगुण जिवान (रा. डोण्णूर, ता. आळंद) यांनी महिलांना वेश्या व्यवसायास प्रवृत्त केले.

बातम्या आणखी आहेत...