आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवे कारभारी:आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग

शिराढोण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील शिराढोण ग्रमापंचायतीच्या १७ जागांसाठी ११५ तर सरपंचपदासाठी ११ उमेदवारी अर्ज दखल झाले आहेत.यामुळे राजकीय हालचालींना वेग आला असून गटबाजीला उधाण आले आहे. शिराढोण ग्रामपंचायत ही १७ सदस्यांची आहे. यावर्षी सरपंचाची निवड थेट जनतेतून होत आहे. सरपंचाची जागा ही ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी चुरस बघायला मिळणार आहे. शिराढोण येथील लोकसंख्या १७ हजार असून सात हजार मतदार आहेत. ग्रामपंचायत सदस्याच्या १७ जागांसाठी ११५ अर्ज दाखल झाले आहेत. तर सरपंचपदासाठी ११ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यामुळे यापैकी कोण उमेदवारी अर्ज मागे घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरपंचपदासाठी गावातील श्रुती सूरजकुमार परदेशी, लक्ष्मी दिलीप म्हेत्रे, उषा एकनाथ माळी, संजीवनी बाळासाहेब सोनके, अनिता जितेंद्र संगवे, मिनाज मतीन बागवान, अश्विनी बाळू दुगाने, मनिषा गोरखनाथ माळी, कमल श्रीकांत खडबडे, सारिका राम जाधवर व अर्चना प्रताप पानढवळे यांनी अर्ज दाखल केले आहेत. यावेळीही शिराढोण ग्रामपंचायतीची निवडणूक लढत चौरंगी होण्याची शक्यता दिसून येत आहे. ७ डिसेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे किती उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार, हे त्यानंतर स्पष्ट होणार आहे. याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

लोहाऱ्यात एक नामनिर्देशन पत्र अवैध लोहारा तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी सोमवारी (दि.५) पार पडली. या दरम्यान फक्त एक नामनिर्देशन पत्र अवैध झाले आहे.तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत होती. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी (दि.२) इच्छुकांची गर्दी झाल्याचे दिसून आले होते. सोमवारी ( दि.५) नामनिर्देशन पत्राची छाननी झाली. यात सदस्य पदासाठीचा फक्त एकच अर्ज अवैध झाल्याची माहिती लोहारा तहसिल कार्यालयाच्या निवडणूक विभागाने दिली आहे. या १३ ग्रामपंचायतसाठी दि. १८ डिसेंबरला मतदान तर २० डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील पांगरदरवाडी येथील ग्रामपंचायत निवडणूकीचा फड चांगलाच तापला असुन भाजपा विरुद्ध भाजपा अशा दोन गटात टक्कर होणार आहे. पांगरदरवाडी ग्रामपंचायतच्या दहा जागेसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार असून थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार आहे. दहा जागेसाठी २४ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले असून छाननीत सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध झाले आहेत. सरपंचपद हे थेट जनतेतून निवडले जाणार असून ओबीसी महिलेला सरपंचपदी विराजमान होण्याची संधी मिळणार आहे.

पांगदरवाडीमध्ये भाजपच्या दोन गटांत टक्कर, नव्यांना संधी भाजपच्या दोन नव्या व जुन्या गटात ही दुरंगी लढत होणार असून काँग्रेसने व शिवसेनेने भाजपच्या जुन्या गटाला जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजपच्या जुन्या गटाने सर्व प्रभागात नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर नवीन गटाने दोन ठिकाणी सरपंच व उपसरपंचपदी विराजमान झालेल्या उमेदवारांना पुनःश्च संधी दिली आहे. भाजपाच्या दोन्हीही गटाने सर्व प्रभागात तरुण उमेदवारांना संधी देण्याचा प्रयत्न केला असला तरी सात डिसेंबरला निवडणूकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...