आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उस्मानाबादेत तुरळक पावसातही साचते रस्त्यावर तळे; गतवर्षी शहरातील मिल्ली कॉलनी, भीमनगरातील घरांमध्ये शिरले होते पावसाचे पाणी

उस्मानाबाद2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

बांधकाम विभागासह पालिकेने पावसाळपूर्व नियोजन केले नाही. यामुळे उस्मानाबाद शहरातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्त्यावर तुरळक पाऊस झाला तरी तळे साचत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून दुचाकी चालकांना कसरत करत मार्ग काढावा लागतो आहे. यामुळे अनेकवेळा दुचाकीस्वार खड्ड्यात अडकल्याच्या व घसरून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, याकडे बांधकाम विभागासह पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांची गैरसोय सुरू आहे.

उस्मानाबाद शहरातील रहिवासी भागासह प्रमुख रस्ते, अंतर्गत रस्त्यावरील खड्डे व रस्त्याच्या बाजुच्या नाल्या मोकळ्या करण्याची गरज असते. मात्र, यंदा बांधकाम विभागाने शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवले नसून पालिकेने मुख्य रस्त्यालगतच्या नाल्या मोकळ्या केल्या नाहीत. यामुळे तुरळक पाऊस झाला तरी रस्त्यावर पावसाच्या पाण्याचे तळे साचत आहे. गतवर्षी उस्मानाबाद शहरातील मिल्ली कॉलनिसह खाजानगर, वैराग रोड भागामधील अनेक नागरिकांच्या घरामध्ये पावसाचे पाणी गेले होते. यामुळे नागरिकांना रात्रभर घरातले पाणी काढावे लागले होते.

यंदा पुन्हा अशी वेळ येण्यापूर्वीच पालिकेने शहरातील मोठ्या व छोट्या नाल्या मोकळ्या करण्याची गरज आहे. तसेच मुख्य रस्त्यालगतच्या नाल्यातील अडकलेला कचराही काढण्याची गरज आहे. मात्र, तोंडावरच्या नाल्या मोकळ्या केल्या जातात. यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरते. तसेच रस्त्यावरही पाण्याचे तळे साचतात. पालिकेने शहरातील पावसाळपूर्व कामे करण्याची गरज आहे. तसेच बांधकाम विभागानेही शहरातील प्रमुख रस्त्यावरील खड्डे बुजवण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

गटारींमधील गाळ काढला नसल्याने अडचण
गतवर्षी भीमनगरमधील काही भागात अनेक नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी गेले होते. यामुळे नागरिकांची गैरसोय झाली होती. तसेच संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. यावर्षी पुन्हा घरात पाणी शिरण्याची भिती आहे. याबाबत यंदा पालिकेला कळवले आहे. मात्र, अद्याप गाळ काढून नाल्या सुरळीत केल्या नाहीत.
गणेश वाघमारे, नागरिक.

बातम्या आणखी आहेत...