आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदघाटन‎:जवाहर महाविद्यालयात पदव्युत्तर विभाग सुरू‎ ; मारुती खोबरे‎ गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती

अणदूर‎2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ‎जवाहर कला विज्ञान व वाणिज्य ‎ ‎ महाविद्यालयामध्ये एम.एस्सी. व‎ एम.कॉम. विभागाचा महात्मा गांधी जयंतीदिनी शुभारंभ करण्यात आला. ‎ ‎ मराठवाडा विभाग औरंगाबादचे शिक्षक‎ आमदार विक्रम काळे यांच्या हस्ते‎ कोनशिला अनावरण व दीपप्रज्वलन‎ करून या कार्यक्रमाचे उदघाटन‎ करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी‎ महात्मा गांधी, लाल बहाद्दूर शास्त्री‎ आणि शिक्षणमहर्षी सि.ना.आलुरे‎ गुरुजींच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते‎ पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी जवाहर महाविद्यालय‎ ‎विकास समितीचे अध्यक्ष रामचंद्र‎ आलुरे हे होते तर औरंगाबाद उच्च‎ न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ, तथा‎ जवाहर महाविद्यालय विकास समितीचे‎ संचालक अॅड.लक्ष्मीकांत‎ पाटील,सेवानिवृत्त मुख्याध्यापक‎ व्ही.जी.पाटील गुरुजी, मारुती खोबरे‎ गुरुजी यांची प्रमुख उपस्थिती होती. या‎ कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून‎ संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर येथील‎ प्रा.डॉ.अजित फडकुले, प्रा.डॉ.दत्ता‎ म्हमाणे, दिशा अकॅडमीच्या संचालिका‎ प्रा.डॉ.नंदा भट्टड,चार्टर्ड अकाऊंटंट‎ प्रा.डॉ.महादेव खराडे,सी- डॅकचे‎ संचालक अक्षत जोशी, शुभम नोगजा‎ यांची उपस्थिती होती. यावेळी संस्कृत‎ विभागाच्या वतीने आयोजित निबंध‎ स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांसह, रसायन‎ व भौतिक शास्त्र विभागाच्या वतीने‎ घेतलेल्या विविध स्पर्धेतील‎ गुणवंताचाही मान्यवरांच्या हस्ते गौरव‎ करण्यात आला.‎ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन‎ प्रा.डॉ.एम.बी.बिराजद ार यांनी केले तर‎ महाविद्यालयाचे उपप्राचार्य‎ डॉ.मल्लिनाथ लंगडे यांनी आभार‎ मानले.‎

बातम्या आणखी आहेत...