आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अल्टिमेटम:15 व्या वित्त आयोगाचा हप्ता न मिळाल्याने वीजपुरवठा खंडित

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

१५ व्या वित्त आयोगाचा हप्ता न दिल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पंपाचा वीज बिलाअभावी पुरवठा खंडित होत असून, अनेक विकासकामांना खीळ बसत आहे. दहा दिवसात शहराचा पाणीपुरवठा व वीज पुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देण्यात आला.

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, नगर परिषदेमार्फत शहराला होणारा पाणीपुरवठा खंडित झाला.

पाणी पुरवठ्याचे वीज देयक नगर परिषद १५ व्या वित्त आयोगातून अदा करते. परंतु शिंदे-फडणवीस सरकारकडून पालिकेला निधी न दिल्यामुळे मुबलक पाणीसाठा असूनही गेल्या चार महिन्यांपासून नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागत आहे. मार्च २०२२ अखेर एक रुपयाची थकबाकी नसलेली उस्मानाबाद ही महाराष्ट्रातील एकमेव नगरपरिषद असताना शिंदे-फडणवीस सरकारने निधी रोखल्याने पाच-सहा कोटींची थकबाकी वाढली.

त्यामुळे महावितरण नगरपरिषदेचा वीज पुरवठा वारंवार खंडित करत आहे. त्यामुळे दहा दिवसात पाणीपुरवठा सुरळीत करा. निवेदनावर सोमनाथ गुरव,संजय मुंडे, राजाभाऊ पवार, बाळासाहेब काकडे, रवी वाघमारे, प्रवीण कोकाटे, पंकज पाटील, तुषार निंबाळकर, गणेश खोचरे, बंडू आदरकर, अभिजित कदम, नीलेश साळुंके, नाना घाडगे, अजय नाईकवाडी, मनोज केजकर, अमित उंबरे, यशवंत शहापालक, महेश लिमये, मन्सूर काझी, मुस्तकीम कादरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.

बातम्या आणखी आहेत...