आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:10 दिवसांपासून वीज बंद, खामसवाडीतील ग्रामस्थांचे महावितरण'मध्ये आंदोलन

उस्मानाबाद17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कळंब तालुक्यातील खामसवाडीत ट्रान्स्फार्मरमधील बिघाडामुळे तब्बल दहा दिवसांपासून वीज बंद असल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. तरीही दुर्लक्षामुळ‌े ग्रामस्थांनी सोमवारी महावितरणच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. आठवडाभरापूर्वीच शेतकऱ्यांनी आत्महदहनाचा इशारा दिला होता. शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयात ३ तास ठिय्या मांडून वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर अधिकाऱ्यांना जाब विचारला.

यावेळी महावितरण कार्यालयातील प्रभारी कार्यकारी अभियंता रवींद्र पवार यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु, जोपर्यंत वीज पुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत आम्ही आत्मदहनाच्या निर्णयावर ठाम, असल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनीही शेतकऱ्यांची समजूत काढली. यावेळी अधीक्षक अभियंता श्रीकांत पाटील यांनी चार दिवसात पूर्ण क्षमतेने विद्युत पुरवठा सुरळीत करणार.

बातम्या आणखी आहेत...