आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महावितरणला वारंवार सुचना:ऐन पूजेच्या वेळी वीज गुल, दिवसभरातही अनेकदा खंड

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भर पावसाळ्यात विजेचे खंडण सुरुच होते. आता मात्र, गेल्या तीन दिवसांपासून शहरात पाऊस नाही. त्यानंतरही वीज खंडीत होण्याचे प्रकार सुरु असल्याचे दिसून आले. बुधवारी ऐन सायंकाळी पूजनाच्या वेळी वीज गुल झाल्याने सर्वांचीच धांदल उडाली होती.निमयित वीज खंडीत होण्याचे प्रकार शहरवासी-यांसाठी नवीन राहिले नाही. गेल्या तीन महिन्यात तीन ते चार तास वीज नसल्याचे प्रकार अनेकदा घडले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागला आहे. अशातच ऐन सणासुदीला वीज गूल होण्यामुळे महावितरण विरोधात नागरिकांचा संताप वाढत चालला आहे. या बाबत नागरिकांनी महावितरणला वारंवार सुचना आणि निवेदन देऊनही कोणताही बदल झाला नाही. अनेकदा ऐन पाणी पुरवठा करण्याच्या वेळी वीज गूल होण्याचे प्रकार सुरु झाल्याने नळाला पाणी असूनही मिळत नसल्याचे प्रकार दिसून आले आहेत. नगर परिषदेकडून कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...