आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मनामनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वतंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटना आणि क्रांतिकारकांचे स्मरण व्हावे. स्वातंत्र्य इतिहासाची आठवण कायम राहावी म्हणून हर घर तिरंगा उपक्रम १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत राबवण्यास विविध उपक्रम घेण्यात येत असल्याचे मुख्याध्यापक प्रकाश बोंडगे यांनी सांगितले.
तालुक्यातील एकुरगा येथील श्री शिवशक्ती विद्यालयात या मोहिमेंतर्गत भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमिताने विविध उपक्रमातून हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा विद्यार्थ्यांचे माध्यमातून राबविण्यात येत आहेत. प्रारंभी शाळेच्या वतीने गावात पहिली प्रभात फेरी काढण्यात आली. “तिरंगा है मेरी जान, भारत देश मेरा महान”, भारतमातेचे सेवक आम्ही, तिरंग्याचे रक्षक आम्ही “ अशा जयघोष करत संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. त्यानंतर घेण्यात आलेल्या चित्रकला या स्पर्धेत शिवानी शिवाजी शिरसे या विद्यार्थिनीने बेटी बचाव बेटी पढाव व बालविवाहाचे चित्र रेखाटून जनजागृती फलक तयार केले. गायत्री महेश लिंबाळे या विद्यार्थिनीने, जलसंरक्षण चित्र काढून पर्यावरण संवर्धनाचा यातून संदेश दिले. प्रीती मधुकर डावरगे हिने आम्ही भारतीय घोषवाक्य तयार केले. मयुरी रवींद्र गायकवाड हिने मेरा भारत महान हे घोषवाक्य तर भाग्यश्री निवृत्ती गायकवाड हिने बालविवाह या विषयावर घोषवाक्य तयार केलेली आहेत. यासाठी मुख्याध्यापक बोंडगे, विजया गायकवाड मार्गदर्शन करत आहेत. वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आल्या. सहशिक्षक राजेंद्र सगर यांनी मार्गदर्शन केले. अभिषेक जवळगे याने स्वतंत्र भारताचे ७५ वर्षे यावर तर भाग्यश्री गायकवाड हिने बालविवाह एक शाप यावर आपले मते व्यक्त केली. शिवानी शिरसे हिने भारताचा स्वातंत्र्य लढा या विषयावर मनोगत व्यक्त केले. यावेळी सहशिक्षक अजित साळुंके, सिद्धेश्वर वाकडे, महादेव करके, म्हाळप्पा कोकरे, सोमनाथ म्हेत्रे,दत्तू कांबळे, मोहन दूधंबे, शिवाजी चेंडके यांच्यासह कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.