आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभातफेरी व जनजागृती अभियान:पोषण महिना अभियानांतर्गत तेरमध्ये प्रभात फेरीचे आयोजन

तेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ता. उस्मानाबाद येथे एकात्मिक बाल विकास प्रकल्पातंर्गत पोषण माह अभियानांतर्गत तेर येथील १४ अंगणवाडीच्या वतीने पोषण आहार प्रभातफेरी व जनजागृती अभियान राबविण्यात आले. गुरुवार दि.१ सप्टेंबर रोजी अंगणवाडी क्रमांक २०१ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बीट अंमलदार प्रकाश राठोड ग्रा.प.सदस्य इर्शाद मुलानी, पत्रकार सुमेध वाघमारे, सुभाष कुलकर्णी ,बापू नाईकवाडी हरी खोटे उपस्थित होते.

यावेळी बालकांनी सकाळचा नाष्टा करावा मस्त, मोड आलेले धान्य करावे फस्त, तिरंगा झेंडा भारताची शान,पोषण आहाराला देऊ पहिला मान,अमृततुल्य दूध मातेचे आरोग्य रक्षण करी बाळाचे या घोषणा देत प्रभातफेरी काढण्यात आली.यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षिका मनिषा पाटील यांनी बालकांच्या पोषण विषयी व कुपोषण निर्मुलन ,बाल विवाह रोखणे संदर्भात उपस्थित मातांना मार्गदर्शन केले.यावेळी अंगणवाडी सेविका प्रभावती वाघमारे, जोशिला लोमटे लिलावती लोमटे अर्चना सोनवणे अर्चना कोकरे ,एस.आय.शेख,रईसा बागवान, सखूबाई राऊत, ,दैवशाला ढवण, मिना बंडगर , रोहिणी कांबळे , सरोजा वाघमारे,लता पेठे, मदतनीस शेवंता सलगर ,अश्विनी खंदारे ,महादेवी शिंदे, अश्विनी भक्ते, मिरा खरात ,स्वाती कांबळे,काशीबाई रसाळ ,सरस्वती खंडागळे,सुशिला वगरे, ,सखूबाई पांढरे ,पद्मिनी माने, दैवशाला भोरे यांच्यासह माता पालक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...