आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान दिन साजरा:विधी महाविद्यालयात संविधानदिनी प्रभात फेरी

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बापूजी साळुंखे विधी महाविद्यालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने विधी महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयातून प्रभात फेरीने झाली. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून संविधान जागृती विषयक घोषणा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान आर. एस. गुप्ता, प्रभारी मुख्य न्या. उस्मानाबाद यांनी भूषविले. तसेच जी. पी. अग्रवाल बी. यू. चौधरी, व्ही. आर. दासरी, वसंत यादव, डॉ. व्ही. जी. शिंदे, प्राचार्य, डॉ. डी. एम. शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

संविधान दिनानिमित्त अचल जानराव या विद्यार्थिनीसोबत सर्व उपस्थितांनी संविधान प्रास्ताविकेचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. संजय आंबेकर यांनी तर डॉ. व्ही.जी. शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. वसंत यादव यांनी विधी सेवा प्राधिकरण याविषयी माहिती दिली. चौधरी यांनी उपस्थितांना मूलभूत अधिकारांवर विवेचन केले. दासरी यांनी मार्गदर्शक तत्वे यावर विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात गुप्ता यांनी भारतीय संविधान विषयक मौलिक विचार मांडले.

कार्यक्रमप्रसंगी नितीन कुंभार, इक्बाल शाह, श्रीयश मैंदरकर, प्रा. अजित शिंदे, प्रा. सोनाली पाटील, संभाजी बागल, आकाश कवडे, बशीर आतार, राहुल ओहळ व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. दीपाली बारकूल तर आभार प्रा. कैलास शिकारे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता शिवानी ढवणे या विद्यार्थिनीने ऑडिओ राष्ट्रगीत वाजवून केली.

बातम्या आणखी आहेत...