आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नळदुर्गमधील प्रकार:प्रधानमंत्री आरोग्य योजनेच्या यादीत धनदांडगे आणि नोकरदारांची नावे

नळदुर्गएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास लोकांना ५ लाख रुपयांचे आरोग्य विम्याची सुविधा मिळावी यासाठी केंद्र सरकार च्या वतीने आयुष्यमान भारत योजना सुरू करण्यात आली आहे.या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी या उद्देशाने सध्या नळदुर्ग शहरांमध्ये नगरपालिकेचे कर्मचारी पात्र लाभार्थ्यांची यादी घेऊन घरोघरी जाऊन आयुष्यमान भारत योजनेचा कार्ड बनविण्याकरिता ई केवायसी करण्यासंदर्भात जनजागृती करीत आहेत. मात्र आयुष्यमान भारत योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये गोरगरीब, गरजूवंत लोकांपेक्षा धन दांडगे, राजकीय लोकांची तसेच शासकीय सेवेत असणाऱ्या नौकरदारांची नावे मोठ्या प्रमाणात असल्याने असल्याने खरे लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

मात्र हे आरोग्य योजना समाजातील आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या लोकांसाठी असताना लाभार्थ्यांच्या यादीत प्राध्यापक, शिक्षकांसह शासकीय सेवेत असलेले विविध प्रकारचे नौकरदारांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे विशेष म्हणजे शासकीय नोकरदाराला सेवेत असताना कोणत्याही आजार झाल्यास उपचारासाठी होणाऱ्या खर्चाचे बिल सादर केल्यानंतर त्याला खर्च केलेली रक्कम परत मिळते याची माहिती असताना सुद्धा असताना काही शासकीय नोकरदारांनी २०११च्या सामाजिक आर्थिक जनगणनेच्या वेळेस सर्वे करण्यासाठी आलेल्या प्रगणकांना लाभ घेण्याच्या उद्देशाने चुकीची माहिती दिल्याने आज आरोग्य योजनेच्या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात नावे आले आहेत.

त्याचबरोबर या यादीमध्ये काही डॉक्टर, इंजिनियर तसेच राजकीय दिग्गज मान्यवरांसह दांडगे लोकांची नावे या यादीमध्ये मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र ज्यांना या योजनेचा खरोखरच लाभ मिळणे अपेक्षित आहे अशा मोल मजुरी करून आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या लोकांची नावे या यादीमध्ये नसल्याने एका प्रकारे नळदुर्ग शहरातील गोरगरीब, गरजूवंत लोकांवर प्रधानमंत्री आरोग्य योजने पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन प्रधानमंत्री आरोग्य योजने पासून वंचित असलेल्या गरजूवंत लोकांचे नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी शहरवासीयांच्या वतीने केली जात आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय नोकरदारांनीही नावे दिली आयुष्यमान भारत योजना ही केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्यमान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू करण्यात आली आहे. व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी २५ सप्टेंबर २०१९ पासून देशभरात लागू करण्यात आल्याची घोषणा केली होती. आयुष्यमान भारत योजना ही ग्रामीण तसेच शहरी भागातील गरीब उपेक्षित कुटुंबीयातील सदस्यांना ५ लाख रुपयांचा आरोग्य विमा उपलब्ध करत आहे. जवळपास ३० हजार लोकसंख्या असलेल्या नळदुर्ग शहरातील वसंत नगर, दुर्गा नगर, इंदिरानगर, वैष्णव नगर, व्यास नगर, नानीमा रोड, माऊली नगर, शास्त्री चौक, शनिवार वाडा, गवळी गल्ली, मराठा गल्ली, काजी गल्ली, मोहम्मद पनाह मोहल्ला, मुलतान गल्ली, कुरेशी गल्ली, इनामदार गल्ली, हत्ती मोहल्ला, भीम नगर, बौद्ध नगर ,रहीम नगर, रामलीला नगर, व्यंकटेश नगर याच्यासह १७ वार्डाच्या विविध भागातील ६२५३ लाभार्थ्यांची निवड प्रधानमंत्री आरोग्य योजनेसाठी करण्यात आली आहे. ही निवड २०११च्या सामाजिक आर्थिक जाती जनगणनेच्या आधारावर लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...