आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिव्यांग व्यक्तीच्या सुरक्षेसाठी दिव्यांग कायदा प्रारीत करण्यात आला यामध्ये दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२ मध्ये दिव्यांग व्यक्ती वर झालेल्या अन्यायाविरुद्ध व त्यांना अपमानास्पद दिलेल्या वागणुकीसंदर्भात ६ महिने ते ५ वर्ष पर्यंतची कारावासाची शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु काही पोलीस स्टेशनमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या कार्यवाहिवर दुर्लक्ष करून त्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत. याबाबतचे निवेदन केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांना प्रहार संघटनेच्या वतीने देण्यात आले. देशातील दिव्यांग व्यक्तीवर होत असलेला हा अन्याय दूर करून दिव्यांग व्यक्तींच्या तक्रारी प्राधान्याने घेण्याचे आदेश राज्यतील पोलीस प्रशासनाला द्यावेत ही मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली.
यावेळी दिव्यांग संघटनेची धडपड पाहून अजय मिश्रा यांनी जिल्हाध्यक्ष मयुर काकडे व बाळासाहेब कसबे यांचा विशेष सत्कारही केला. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे,आमदार राणा जगजितसिंह पाटील ,युवा मोर्चाचे प्रदीप शिंदे ,राजसिंह राजेनिंबाळकर,प्रशांत शिनगारे हे देखील उपस्थित होते. तसेच संघटनेच्या वतीने बच्चू भाऊ यांच्या जीवनावर आधारित लोकनायक हे पुस्तक भेट देण्यात आले.
यावेळी प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे,जिल्हासंघटक बाळासाहेब कसबे,जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,वाघोली शाखाध्यक्ष चांद पटेल,संतोष मगर,सरताज पठाण, मुन्ना मुजावर,विशाल मगर,रोहित क्षीरसागर,सत्यवान मगर,हरीश्वर कुंभार व समस्त वाघोली शाखेतील पदाधिकारी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.