आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटीस:प्रक्षाळ मंडळाचे विशाल रोचकरी यांना मंदिर बंदी ; देऊळ कवायत कलमानुसार केली कारवाई

तुळजापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विना परवाना तुळजाभवानी मातेच्या मंदिरातील गाभाऱ्यात घुसखोरी केल्याप्रकरणी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यांना १ महिना मंदिर बंदीची कारवाई करत ३ महिने मंदिर बंद का करण्यात येऊ नये, अशी विचारणा करणारी नोटीस मंदिर प्रशासनाने बजावली आहे. देऊळ कवायत कलमानुसार मंदिर प्रशासनाने ही कारवाई केली आहे.

गेल्या महिन्यात २४ ऑक्टोबर रात्री ८:१५ च्या सुमारास विशाल रोचकरी यांनी त्यांच्या मुलीसह जुन्या व्हीआयपी गेटने महंत तुकोजी बुवा यांच्या पाठीमागे थेट गाभाऱ्यात प्रवेश तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.याप्रकरणी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर यांची तक्रार तसेच सुरक्षा कंपनीच्या अहवालावरून देऊळ कवायत कलम २४ व २५ नुसार विशाल रोचकरी यांच्यावर १ महिना मंदिर बंदची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय ३ महिने मंदिर बंद का करण्यात येऊ नये,अशी विचारणा करत ७ दिवसांच्या आत खुलासा सादर करण्यास सांगितले आहे.तथापि जिल्हाधिकारी बदलीनंतर कारवाईची प्रकरणे कमी झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...