आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कौतुक:प्रथमेश अमृतरावची शालेय क्रीडा स्पर्धेत विभागीय फेरीत धडक

तुळजापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोटस पब्लिक स्कूलचा विद्यार्थी प्रथमेश अमृतराव याने जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस आणि लॉन टेनिस स्पर्धेत उत्कृष्ट खेळी करत विभागीय फेरीत धडक मारली आहे. त्याने जिल्हास्तरीय लाॅन टेनिस स्पर्धेत द्वितीय क्रमांक तर शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावला आहे. प्रथमेश याच्या यशाबद्दल त्याचे कौतुक होत आहे. या यशाबद्दल लोटस पब्लिक स्कूलच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय जाधव, संस्थेचे सचिव आणि मुख्याध्यापक धनंजय शहापुरे, कोषाध्यक्ष सचिन सूर्यवंशी, श्रीकांत कावरे यांच्यासह शाळेतील शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्याला प्रशिक्षक संजय नांगरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

बातम्या आणखी आहेत...