आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रशिक्षण:कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पाथरूड येथे पेरणीपूर्व प्रशिक्षण

पाथरूड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भूम तालुक्यातील पाथरूड येथे कृषी विभागातर्फे यंत्र जोडणी व पेरणी करताना घ्यायची काळजी याबाबत ट्रॅक्टर चालकांची तालुकास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली.बीबीएफ पद्धतीने पेरणी,प्रचलित पेरणी करताना बियाण्याची खोली योग्य राखणे व उगवणक्षमता,उत्पादन चांगले येण्यासाठी पेरणी करताना काळजी घेणे गरजेचे असते त्या अनुषंगाने ट्रॅक्टर चालक व शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या दृष्टीने पूर्व तयारी म्हणून आवश्यक महत्वपूर्ण माहिती देण्यात आली.

यामध्ये उगवणक्षमता तपासणी, बीजप्रक्रिया, बीबीएफ व टोकन पद्धतीने लागवड, आंतरपिक पद्धत, रासायनिक खतांचा संतुलित वापर, कृषिक अँप वमहाडीबीटी पोर्टल,पीकविमा इ विषयासोबतच उत्पन्न वाढीच्या दृष्टीने शेतकऱ्यांशी चर्चा करण्यात आली.यावेळी तालुका कृषी अधिकारी गायकवाड, मंडळ कृषी अधिकारी रायकर, वाघमारे, कृषी पर्यवेक्षक श्री गलांडे कृषी सहायक श्रीमती शिंदे तालुक्यातील कृषी सहायक गावातील नागरिक महादेव वडेकर संजयकुमार बोराडे, राजेंद्र पवार, विजयकुमार बोराडे, वैजिनाथ मामाने, तुषार पवार, रामहरी नागरगोजे , उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...