आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यात माडज येथे तीर्थक्षेत्र सद्गुरू प्रेमनाथ महाराजांची पालखी पायीवारी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे. चैत्रवारी निमित्ताने पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. ग्रामदैवत श्री सद्गुरू प्रेमनाथ महाराजांनी ४०० वर्षांपूर्वी संजीवन समाधी घेतली आहे.
माडजगावचे ग्रामदैवत मानले जाते मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे सर्व यात्रा रद्द करण्यात आल्या होत्या. कोरोना संसर्गाची लाट ओसरल्याने निर्बंध मागे घेण्यात आले आहेत तब्बल दोन वर्षांनंतर चैत्रीवारी पुन्हा सुरू होणार असल्याने माडज व परिसरातील हजारो महिला व पुरुष भाविक भक्त पंढरपूरकडे पायीवारीत सहभागी झाले आहेत. माडज संत प्रेमनाथ महाराज यांची पालखी प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी गावातील मोठ्या प्रमाणात महिला-पुरुष, युवक व वारकरी दिंडी पताका घेऊन सहभागी झाले होते.
गावात वर्षानुवर्षे चालत असलेली परंपरा आजही टिकून असल्याने माडज हे गाव धाकल पंढरपूर म्हणून ओळखले जाते. पालखी जात असताना गावात पूर्ण आनंदाचे वातावरण असते. गावच्या वेशीपर्यंत टाळ-मृदंगाच्या गजरात पालखी पाठवून देण्यात येते. नाथाची पालखी पंढरपूरहून परत गावात आल्यानंतर गावातील भाविकभक्त पालखीचे दर्शन घेण्यासाठी वेशीवर एकत्र येत पालखीचे उत्साहात स्वागत करतात.
पालखीची गावातच प्रदक्षिणा घातली जातो आणि जंगी कुस्त्या होतात कुस्त्यासाठी माडज गावासह परिसरातील आणि राज्यातील विविध भागातून पट्टीचे मल्ल येतात मोठ्या प्रमाणात जंगी कुस्त्या होतात. वैजनाथ महाराज मंदिरात दिवसभर भक्त भाविक दर्शन घेतात सायंकाळी पालखीसह दिंडी नाथाच्या मंदिराकडे प्रस्थान होते. महाआरती होऊन दिंडीची सांगता होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.