आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्यत्र परीक्षा‎:पोलिस भरतीसाठी 552 पेक्षा अधिक‎ उमेदवारांची तयारी; अन्यत्र परीक्षा‎

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ५५२ पेक्षा जास्त‎ अधिक उमेदवार पोलिस भरतीची ‎ ‎तयारी करत असून ग्रामीण‎ भागातून शहरात येऊन भरतीचे‎ मैदान मारण्याची तयारी करत‎ आहेत. दुसरीकडे पोलिसांच्या ‎यावेळी उस्मानाबाद मध्ये जागा ‎नसल्याने येथील उमेदवारांना ‎मुंबई-पुण्यासह लातूर, सोलापूर, नाशिक व अन्य जिल्ह्यात जाऊन ‎ ‎परीक्षा देण्याची वेळ आली‎ असल्याचे समोर आले आहे.‎

त्यामुळे अनेकांची परवड होत‎ असल्याचे दिसून आले.‎ ग्रामीण भागातून शहरात येऊन‎ विविध अॅकॅडमी तसेच स्वत:‎ पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या‎ उमेदवारांची संख्या शहरात‎ मोठ्या प्रमाणात आहे. मात्र,‎ राज्यातील अनेक जिल्ह्यात‎ पोलिसांच्या जागा भरण्यात येत‎ असल्या तरी, उस्मानाबाद‎ जिल्ह्यात यंदा एकही पोलिस‎ भरतीसाठी जागा नसल्याने‎ स्थानिक उमेदवारांना बाहेर‎ जिल्ह्यात जाऊन परीक्षा देण्याची‎ वेळ आली आहे. यातही‎ सर्वाधिक जागा मुंबईत असल्याने‎ तेथे जाऊन परीक्षा आणि मैदानी‎ कसरत करण्याची तयारी‎ इच्छुकांनी सुरु केली आहे.‎

शहरातील नगर परिषदेच्या‎ शाळेच्या मैदानासह श्री‎ तुळजाभवानी क्रीडा संकूल,‎ बार्शी रस्त्यावरील मैदानासह‎ शहरातील विविध मैदानावर हे‎ उमेदवार तयारी करत असल्याचे‎ चित्र दिसून येत आहेत. मुलींचीही‎ संख्या अधिक आहे.

जिल्ह्यात पोलिसांच्या‎ रिक्त जागाच नाही‎
यंदा जिल्ह्यात पोलिस भरती होणार‎ नसल्याने आम्ही मुंबई - पुण्याचे‎ अर्ज भरले आहेत. त्यामुळे आता‎ जेंव्हा तिथली परीक्षा होईल, तेंव्हा‎ तेथे जाऊन आम्हाला परीक्षा द्यावी‎ लागणार आहे. मोठ्या प्रमाणात‎ शहरात ग्रामीण भागातून उमेदवार‎ येऊन तयारी करत आहेत.‎ -महेश वाघ, परीक्षार्थी

बातम्या आणखी आहेत...