आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहरातील मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन; तेर व लोहारा येथे अण्णाभाऊंना आदरांजली

तेर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सत्यशोधक विचारवंत संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती १ ऑगस्ट रोजी आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने साजरी करण्यात आली. यावेळी जि.प.चे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, जोशिलाताई लोमटे, धर्मराज रसाळ, कानिफनाथ देवकुळे यांनी मार्गदर्शन केले. आभार संभाजी कांबळे यांनी मानले.

यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कानिफनाथ देवकुळे ,सरपंच नवनाथ नाईकवाडी शिवाजीराव नाईकवाडी, संभाजी भाऊ कांबळे, अजय कांबळे, अमोल कसबे, विनोद कांबळे, शशीकांत सोनवणे, संभाजी शिंदे,भारत कसबे, श्रीमंत तेरकर, विलास रसाळ,धर्मराज रसाळ, प्रज्योत रसाळ, आदिंसह येथील समाज बांधव यांनी अभिवादन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण लोमटे यांनी तर आभार संभाजी कांबळे यांनी केले.

लोहारा येथे कार्यक्रम
लोहारा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोमवारी (दि.१) लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन अभिमान खराडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी सरपंच नागण्णा वकिल, उपनगराध्यक्ष आयुब शेख, नगरसेवक अविनाश माळी, जालिंदर कोकणे, प्रमोद बंगले, बाळासाहेब पाटील, दिपक रोडगे, विजय ढगे, किशोर पाटील, श्रीकांत भरारे, हाजी बाबा शेख, हरी लोखंडे, आदींसह नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...