आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाऊस:जोरदार पावसाने हजेरी; काही मंडळ विभागात मृग नक्षत्राच्या शेवटी पाऊस

उमरगा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रोहिणी नक्षत्रात शेवटच्या टप्प्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने काही भागातील शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली होती. पेरणी होवून १५ दिवस पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत होता. प्रदीर्घ विश्रांतीनंतर शनिवारी (१८) दुपारी मृग नक्षत्रातील शेवटच्या टप्प्यात पावसाने शहरात रिमझिम तर भुयार चिंचोली, तलमोड, कोथळी परिसरात सुरुवात केल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत असला तरी सरासरी ६६६ मिलिमीटर पाऊस झाला असल्याने खरीप पेरणीसाठी आर्द्रा नक्षत्राकडून अपेक्षा आहे.

तब्बल १५ दिवसानंतर झालेल्या पावसामुळे कांही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असलातरी तालुक्यात सर्वदूर पाऊस नसल्याने शेतकऱ्यांना अद्याप ही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. रोहिणी नक्षत्रात मान्सूनपुर्व पावसाने सुरुवात केली होती. त्यानंतर तब्बल पंधरा दिवसाने मृग नक्षत्रात शेवटच्या टप्प्यात पाऊस झाला असून आर्द्रा नक्षत्रात तरी तालुक्यात सर्वदूर दमदार पाऊस झाला तरच खरीप हंगामातील सर्व क्षेत्रावर पेरणी होणार असल्याने शेतकऱ्यांना येणाऱ्या नक्षत्राकडून मोठी अपेक्षा आहे.

तालुक्यात २७५ हेक्टर क्षेत्रात झाली पेरणी
तालुक्यातील खरीप हंगामातील पेरणी क्षेत्रापैकी आतापर्यंत २७५ हेक्टर क्षेत्रावर आगोटी पेरणी झाली असून जवळपास ९० टक्के शेतकऱ्यांनी खते, बियाणांची खरेदी करून पेरणी च्या तयारीत आहेत, शंभर टक्के पेरणी होण्यासाठी अद्याप पाऊस झाला नसल्याने शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

बातम्या आणखी आहेत...