आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट:मंदिरास अत्याधुनिक भोंगा फोन भेट

उस्मानाबाद8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर मध्ये श्रीदेविजींचा शारदीय नवरात्र महोत्सव सुरु आहे. यात भाविकांना विविध प्रकारच्या सुचना, माहिती, मार्गदर्शन करण्यासाठी भाविकाने मंदिरास अत्याधुनिक पद्धतीचे भोंगा फोन भेट म्हणून दिले आहेत. या नवरात्र महोत्सव कालावधीत महाराष्ट्र राज्यासह शेजारील कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व इतर अनेक राज्यातून खूप मोठ्या प्रमाणात भाविक भक्त श्रीदेविजींचे दर्शनासाठी मंदिरात दाखल होतात.

यात्रा काळात भाविकांना योग्य मार्गदर्शन व सूचना देण्यासाठी आधुनिक पद्धतीची ध्वनिफीत श्री देवीचे भक्त नानासाहेब पाचुंदकर रांजणगाव, राहणार पुणे यांनी दहा ध्वनी फित भोंगा फोन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानास अर्पण केले आहेत.

यावेळी उपविभागीय अधिकारी तथा विश्वस्त सदस्य योगेश खरमाटे, तहसीलदार तुळजापूर सौदागर तांदळे, योगिता कोल्हे तहसीलदार तथा व्यवस्थापक प्रशासन, सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक विश्वास कदम, सहाय्यक जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे, गणेश नाईकवाडी, रवी गायकवाड, संकेत वाघे, पुजारी राम छत्रे व सुरक्षा रक्षक आदी उपस्थित होते.