आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसेवकांचा गौरव:परंड्यामध्ये परिचारिका व परिसेवकांचा गौरव ; दिव्य मराठी विशेष उपजिल्हा रुग्णालयात सत्काराचा कार्यक्रम, मान्यवर उपस्थित

परंडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक परिचारिका दिनानिमित्त तसेच लोकमंगल समूहाच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून येथील उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका व परिसेवकांचा गौरव गुरुवार (दि.१२) करण्यात आला.येथील उपजिल्हा रुग्णालयात लोकमंगल समूहाच्या वतीने जागतिक परिचारिका दिना निमित आयोजित गौरव सोहळा कार्यक्रमासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. अब्रार पठाण, ॲड.नागनाथ सूर्यवंशी, डॉ आनंद मोरे, डॉ.चंद्रकांत शिंदे, डॉ. अमिता वऱ्हाडे लोकमंकल बँकेचे अधिकारी स्वप्नील राऊत, अतुल माळी आदी उपस्थित होते. यावेळी फ्लोरेन्स नाईटिंगल यांची कर्तव्य भावना सर्व परिचारिका आणि परिसेवाकांमध्ये आहे म्हणून अविरत सेवा चालू आहे. तसेच डॉ. चंद्रकांत शिंदे यांनी परिचारिका परिसेवक या आरोग्य सेवेचा कणा आहेत असे मत मांडले.

आरोग्य सेवा परिचारिकां शिवाय अपूर्णच राहील. परिसेविका रुग्णालयीन सेवेचा अविभाज्य घटक आहे. असे मत डॉ आनंद मोरे यांनी व्यक्त केले. यावेळी सुनिता कुलकर्णी, सुलोचना केसकर, जयश्री लावंड, क्रांती हुलुळे, शिवगंगा गायकवाड, दुधकवडे, पारखे, जगदाळे, तसेच बिपीन शिंदे, रोहन जाधव, शेख, मुंडे आदीचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रभान पवार, बापुराव खताळ, रविंद्र करपे, अमर पठाण यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी तानाजी गुंजाळ यांनी कर्मचारी यांना शपथ दिली तर सुत्रसंचालन मकरंद वांबुरकर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...