आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिष्ठानचा गौरव:जागतिक रक्तदाता दिनानिमित्त प्रसेना प्रतिष्ठानचा गौरव ; प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात

उस्मानाबाद10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वर्षभर विशेष दिनानिमित्त रक्तदान शिबिरांचे आयोजन करुन शासकीय रक्तपेढीला वेळोवेळी रक्त संकलनात सहकार्य करणाऱ्या प्रसेना प्रतिष्ठानचा जिल्हा रूग्णालयाच्या वतीने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त गौरव करण्यात आला.

शासकीय रक्तपेढीच्या वतीने मंगळवारी (दि.१४) जिल्हा रुग्णालयात जागतिक रक्तदाता दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते रक्त विलगीकरणाच्या कार्यात नोबेल पुरस्काराने सन्मानित डॉ. कार्ल लॅन्डस्टिनर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

यावेळी प्रसेना प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप बनसोडे यांनी संस्थेच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते गौरव स्वीकारला. प्रसेना प्रतिष्ठान मागील १३ वर्षांपासून उस्मानाबाद शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर घेत आहे. तसेच रक्ताचा तुटवडा असल्यासही संस्थेच्या वतीने सदस्य शासकीय रक्तपेढी येथे रक्तदान करण्यात येते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अश्विनी गोरे, जिल्हा शल्यिचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तानाजी लाकाळ, डॉ. अशोक कठारे, डॉ. नानासाहेब गोसावी, डॉ. सतीश आदटराव, डॉ. अमोल कापसे, रुग्णकल्याण समितीचे सदस्य अब्दुल लतीफ यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शासकीय रक्तपेढी विभागाच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातम्या आणखी आहेत...