आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील महात्मा गांधी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.२३) झाला. येथील महात्मा गांधी विद्यालयातील माध्यमिक शालांत परीक्षेत ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे सुमारे ४८ विद्यार्थी आहेत त्यांचा व त्यांच्या पालकांचा गौरव करण्यात आला.कार्यक्रमासाठी गट विकास अधिकारी संतोष नागटिळक, वैद्यकीय अधिकारी अस्मिता गायकवाड, माढा येथील नगराध्यक्षा ॲड. मिनल साठे, मुख्याध्यापक आर. के. घाडगे आदीची प्रमुख उपस्थित होते.
विद्यालयातील एकूण विद्यार्थी १९६ असून त्यापैकी १९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन ११६ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण तर ६६ विद्यार्थी प्रथम श्रेणी मध्ये उत्तीर्ण झालेले आहेत तसेच ९० टक्के पेक्षा जास्त गुण मिळवणारे एकूण विद्यार्थी ४८ आहेत विद्यालयाचा एकूण ९७.६० टक्के निकाल लागला आहे.गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करून त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या तसेच महात्मा गांधी प्रशालेतील शिक्षकांचे कौतुक केले. प्रशालेतील शिक्षक लोकरे, पाटील ,जाधव, काशीद, नलवडे ,तोडसाम, खोत, पेजगुडे सूर्यवंशी, गायकवाड, सोनवणे, जगदाळे, शेरे, चामवाड, ठाणाबीर, बागडे, हिंगे आदीनी परिश्रम घेतले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.