आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउमरगा तालुक्यातील दाळिंब येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केलेल्या विविध गुणदर्शन,सामान्य ज्ञान परीक्षा,भाषणे, पोवाडे, विद्यार्थ्यांना भाषण देणेची कला सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांना शब्बीर पटेल यांच्या स्मरणार्थ मैत्री ग्रुप दाळींब तर्फे व इंदुबाई वैजीनाथ पावडशेट्टी यांच्या स्मरणार्थ डॉ. अमर वैजनाथ पावडशेट्टी यांच्यामार्फत विविध बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
यावेळी त्या स्पर्धेत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांचा व वर्ग शिक्षकांचाही येथे सन्मान करण्यात आला. या समारंभानंतर शाळेचे मुख्याध्यापक कोकळगाव सर व सर्व शिक्षकांचाही गावकऱ्या तर्फे सन्मान करण्यात आला. यावेळी बिट विस्तार अधिकारी कानडे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी च्या मैत्री ग्रुप दाळींब तर्फे १०चटई भेट देण्यात आल्या. यावेळी गावचे सरपंच रंजनाताई सातपुते, उपसरपंच आसिफ भाई शिलार व ग्रामपंचायत सदस्य ओम टिकबरे ,धाेंडाबाई देवकते व शालेय शिक्षकांच्या अधिवेशन काळात सहकार्य केलेल्या भावी शिक्षकांचाही यावेळी या ठिकाणी सन्मान करण्यात आला. शालेय समितीचे अध्यक्ष सुलक्षणा कांबळे ,मैत्री ग्रुपचे सहकारी-. शिवानंद शिरोळे, किशोर मुगळ व इतर मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रम झाला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.