आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणी:प्रभागात समस्या कायम; वक्फ बोर्डामुळे अडचणी

उस्मानाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रभाग एक ते चार मध्ये नगरसेवकांनी कोट्यवधी रुपयांची कामे केली आहेत. तसेच निधी असूनही वक्फ बोर्डाच्या अडचणीमुळेही प्रभाग क्रमांक एक मधील कामांना खिळ बसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. प्रभाग दोन तीन, चार मध्ये समाधानकारक कामे झाल्याचा दावा माजी नगरसेवकांनी केला. दिव्य मराठीच्या वतीने जनतेचे प्रश्न थेट प्रशासना समोर मांडण्यासाठी रुबरु हा विकास मंचचा यात रविवारी पहिला कार्यक्रम बँक कॉलनीतील सरस्वती हायस्कूल येथे झाला.

यांनीही मांडल्या रुबरु मध्ये समस्या
राहुल माकोडे यांनी शिक्षण, पाणी पुरवठा, शौचालयाची समस्या मांडली. श्रीकांत भुतेकर यांनी बगिच्यासाठी दोन कोटी रुपये खर्च करता. नेमकी इतकी गरज आहे का? निंबाळकर यांनी भुयारी गटारातून काही भाग वगळला का असे विचारले. महेश, विनोद निंबाळकरांनी लॉनच्या मागे अतिक्रमण केल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरते. ते अतिक्रमण काढा अशी सुचना केली. विश्वास शेवाळे, रामेश्वर सोनटक्के, नाना इंगळे यांनी प्रभागात सुविधा नसल्याचे सांगितले. अतुल अदमाने यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राची मागणी केली. शिवानंद कथले, विक्रम राऊत, चांद पाशा शेख, अभिजीत देडे, बाळकृष्ण घुगीकर, विलास सांजेकर आदींनी सहभागी होत समस्या मांडल्या.

पोलिस लाइनमध्ये दुरावस्था
पोलिस लाइन मध्ये माेठ्या प्रमाणात समस्या आहेत. ड्रेनेजची समस्या आहे. रस्ता अद्यापही करण्यात आला नाही. पाणीही वेळेवर येत नाही. घरांची दुरावस्था झाली आहे. मुलांना खेळण्याची सुविधा उपलब्ध नाही. पोलिस ग्राऊंडची समस्या मार्गी लावा. घंटा गाडी रोज येत नाही. नप ने भिकाऱ्यांसाठी काही सुविधा करावी.''
पूजा देडे, नागरिक.

दहा वर्षातही रस्ता झाला नाही
गेल्या दहा वर्षांत गॅस पंपाचा रस्ता करण्यात आला नाही. त्याच बरोबर बँक कॉलनी चाही रस्ता करण्यात आला नाही. लोकप्रतिनिधींच्या घरासमोरच रस्ता करण्यासाठी निधी आहे का? महिलांसाठी कोणता निधी किती खर्च केला ? सोसायटीत मोकळा भूखंड असूनही नप काही करत नाही. संदीप इंगळे, नागरिक.

नालीचे काम अनेक वर्षांपासून नाही
विठ्ठल मंदिर परिसरात रोडसह नालीचे काम अनेक वर्षापासून झाले नाही. निरकळ घर ते खडके घर, शेळके घर, यादव घर, थडवे घर रोड काम झाले नाही. नगरसेवकाच्या विरोधी पक्षात असल्याने पंचवार्षीकमध्ये आमचे कामे झाले नाहीत. नालीचा पाइप स्वखर्चाने बसवला.
अजयकुमार यादव, नागरिक.

पावती करूनही अस्वच्छता
शहरातील चौकात, कॉर्नरवर कचऱ्याचे ढीग असतात. तसेच आठवडी बाजारातही मोठ्या प्रमाणात कचरा असतो. पालिकेकडून व्यापाऱ्यांकडून पावती घेतली जाते. मात्र, स्वच्छता केली जात नाही. पालिकेने सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करावी.-अमोल पेठे, नागरिक.

पालिकेने दखल घेतली नाही
प्रभागातील संत तुकाराम नगरमध्ये स्वच्छतेसाठी अनेक वर्षापासून पाठपुरावा केला जात आहे. पालिकेत अनेक अर्ज दिले आहेत. मात्र, नगरसेवकांनी लक्ष दिले नसून पालिकेनेही कोणती दखल घेतली नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होत असून सुविधा देण्याची गरज आहे.-के. वाय. गायकवाड, नागरिक.

सिव्हिलऐवजी मेकॅनिकल इंजिनिअर
शहरात अंडरग्राउंड ड्रेनेजचे काम सुरू असून त्या कामावर देखरेख करण्यासाठी सिव्हील इंजिनिअरची गरज असते. परंतु, नगरपालिकेने मेकॅनिकल इंजिनिअरची नेमणूक केली आहे. या कामात लाईन लेवल तसेच टेक्निकल अडचणी आल्यास जबाबदार कोण राहणार.’’राहुल गवळी, नागरिक.

बातम्या आणखी आहेत...