आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामातोश्री ग्रामसमृध्दी योजनेतील कामांना अगोदरच मंजुरी मिळाली आहे. मात्र कार्यारंभाची प्रक्रिया प्रशासनाने केली नाही. प्रक्रिया पूर्ण करून ९ मेपर्यंत कार्यारंभ आदेश देण्याची सूचना आमदार कैलास घाडगे-पाटील यानी संबधित अधिकाऱ्यांना दिली.
उस्मानाबादेत रोजगार हमी योजनेच्या कामांचा आढाव्यासाठी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला रोहियो उपजिल्हाधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तहलिसदार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता, भूमी उपअधीक्षक अधिकारी, जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, तालुक्यातील ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
शेतीला बारमाही रस्त्याची आवशयकता असल्याने विविध योजनांच्या अभिसरणाच्या माध्यमातून रस्त्याची कामे होणे आवश्यक आहे. त्यामध्ये काही अडचणी असतील त्याची सोडवणुक सामंजस्याने करण्याची सूचना यावेळी आमदार पाटील यानी दिल्या.अगोदरच्या कामे सूरु नसल्याने त्या प्रत्येक कामाची अडचण यावेळी ऐकून घेण्यात आली. गावातील सरपंच व ग्रामसेवक यानी केलेल्या मागणीचा विचार यावेळी करण्याच्या सुचना यावेळी देण्यात आल्या आहेत. मातोश्री ग्रामसमृध्दी शेत, पाणंद रस्ते योजना राबविण्यास मान्यता मिळाल्यानंतर तालुक्यामध्ये ९४ कामे मंजूर झाले आहेत. अजूनही अनेक कामाची तांत्रिक मान्यताच झालेली दिसत नाही. त्यामुळे प्रत्येक कामाचे प्रस्ताव तयार करण्याची कोणाच्या अंतर्गत ही कामे करायची हे देखील यावेळी ग्रामसेवक व सरपंचाकडुन जाणुन त्यापध्दतीने कामाची रचना करण्यात आली.
कामांची टक्केवारीनुसार विभागणी: ग्रामपंचायतीच्या स्तरावर ५० टक्के, जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे २५ व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे २५ टक्के कामे पूर्ण करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार त्यानी प्रस्ताव सादर करुन येत्या नऊ मेपर्यंत याचे कार्यारंभ आदेश येतील यादृष्टीने प्रक्रिया राबविण्याचे आदेशही आमदार पाटील यानी प्रशासनाला दिले आहेत.काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या अडचणी येतात तेव्हा तिथे तहसिलदार व भुमिअभिलेख विभागाच्या समन्वयाने तो प्रश्न निकाली काढण्यात यावा अशी अपेक्षा आमदार पाटील यानी व्यक्त केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.