आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाॅग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला पाठिंबा देण्यासाठी काढण्यात आलेल्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग नोंदवला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला. भवानी रोड, महाद्वार, आर्य चौक, कमानवेस मार्गे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी महाद्वार समोर महाआरती करण्यात आली. पदयात्रेत “नफरत छोडो - भारत जोडो”, “राहुल गांधी तुम आगे बढो - हम तुम्हारे साथ है” आदी घोषणा देण्यात आल्या. पदयात्रेत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अॅड. धिरज पाटील, तालुकाध्यक्ष अमर मगर, चिन्मय मगर, मुकुंद डोंगरे, सुनील रोचकरी, अमोल कुतवळ, रणजित इंगळे, लखन पेंदे, शेतकरी कामगार पक्षाचे राहुल खपले, शिवसेनेचे सुधीर कदम, शाम पवार यांच्यासह ओम जगदाळे, अभिजीत कदम, विक्रम कदम, नाना पेंदे, किरण कदम, किरण अणदूरकर, गणेश इंगळे, मयुर शिंदे, योगेश इंगळे, बाबा इंगळे, आबा रोचकरी आदींसह काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रातून मार्गस्थ होत असून त्यांच्या या यात्रेत हजारो कार्यकर्ते सामील आहेत. त्यांना भेटण्यासाठी काँग्रेससह समविचारी पक्षांचे अनेक नेते यात्रा मार्गात राहुल गांधी यांची भेट घेतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.