आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:प्रा. भोसले हे विद्यापीठ, जिल्ह्याची शैक्षणिक उंची वाढवणारे नेतृत्व; रमेश दापके यांचे मत

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभेच्या बैठकीत अध्यक्ष प्राचार्य डॉ. रमेश दापके यांनी विद्यापीठाची उन्नती, उत्कर्षाचा इतिहास सर्वांसमोर मांडला. विद्यापीठाच्या पदवीधर अधिसभेच्या निवडणुकीत विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे उमेदवार प्रा. संभाजी भोसले हे नेतृत्व विद्यापीठाच्या शैक्षणिक उंचीत भर घालणारे आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्ह्याची शैक्षणिक गरज लक्षात घेऊन विद्यापीठ उपपरिसराचा विकास ही सर्वांची जबाबदारी आहे. या जबाबदारीची जाणीव प्रा. संभाजी भोसले यांनी ठेवत उपपरिसरात नाट्यशास्त्र विभाग सुरू केला, विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचे उमेदवार प्रा. संभाजी भोसले यांना खुल्या प्रवर्गातून पदवीधर अधिसभेवर पाठवावे, असे आवाहन दापके यांनी केले. प्रा. संभाजी भोसले यांनी विद्यार्थी केंद्रित कामाची ग्वाही दिली. बैठकीत आरपी कॉलेजचे प्राचार्य डॉ.जयसिंगराव देशमुख यांनी बैठकीचे प्रास्ताविक केले व उपस्थितांना मार्गदर्शन केले.

पदवीधर अधिसभेच्या बैठकीत डॉ. सुयोग अमृतराव, प्रा. डॉ. नितीन पडवळ, बालाजी इतबारे यांनी मनोगत व्यक्त केली. बैठकीसाठी प्रा.सचिन बस्सये, प्रा.डॉ. विक्रम शिंदे, डॉ. संदीप देशमुख, डॉ. वैभव आगळे, डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. संभाजी धुमाळ, डॉ. शिवाजी जेटीथोर, प्रा. जे. व्ही. पाटील, मेंढेकर, डॉ. अमर निंबाळकर, दुर्गेश साळुंखे, सागर चव्हाण, विशाल शिंगाडे आदींसह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...