आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भेट‎:प्रा. राऊत यांच्यातर्फे सार्वजनिक ‎सुविधेसाठी पाण्याची टाकी भेट‎

शिराढोण2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील भूमिपुत्र प्रा. डाॅ. सत्येंद्र राऊत‎ यांच्यातर्फे सार्वजनिक पाण्याची सुविधा व्हावी,‎ यासाठी येथील महाजन गल्लीत पाण्याची टाकी भेट‎ देण्यात आली. प्रा. राऊत यांच्यातर्फे यापूर्वीही‎ सामाजिक काम व लोकसहभाग म्हणून सार्वजनिक‎ ठिकाणी वापर होणार्या वस्तू भेट दिल्या होत्या.‎ गुरुवारी (दि.२) भेट दिलेल्या टाकीचे पूजन करुन ही‎ टाकी नागरिकांना खुली करण्यात आली.

या टाकीत‎ दररोज पाणी भरण्याची जबाबदारी येथील ओमकार‎ टेळे यांनी घेतली आहे. याप्रसंगी सरपंच लक्ष्मी म्हेत्रे,‎ पद्माकर पाटील, नितीन आबा पाटील, अॅड. अनुप‎ कुमार परदेशी, नामदेव माकोडे, जनार्धन महाजन,‎ सुरेश महाजन, वैभव पाटील, ग्रामपंचायत सदस्य‎ बेबीनंदा गोरे, ज्योती महाजन, नितीन धाकातोडे,‎ परमेश्वर धाकतोडे उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...