आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील ४० युवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार यांच्या हस्ते युवक प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, जिल्हा कार्याध्यक्ष बाबा जाफरी, तालुकाध्यक्ष संजय पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (दि.१०) प्रवेश झाला. शहरातील हमीद नगर, काळे प्लॉट, पतंगे रोड, हनुमान नगर भागातील ४० युवकांनी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या विचारांवर श्रद्धा ठेवून जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत उमरगा येथे पक्ष कार्यालयात जाहीर प्रवेश केला.
देशातील वाढती अराजकता, लोकशाहीची पायमल्ली, युवक बेरोजगारांची वाढती संख्या, धर्मांधतेला खतपाणी घालून विचारसरणीला आळा घालण्यासाठी युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी उभे रहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष प्रा. बिराजदार यांनी केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये संतोष सूर्यवंशी, रितेश गायकवाड, रोमान शेख, अग्नेश सगर, अय्यान शेख, प्रसाद गायकवाड, लखन कांबळे, चांद फकीर, निखिल पाटील, लयमत लंगडे, इरफान लदाफ, संजय भोसले, पवन भोसले, रघुवीर भोसले, सलमान लदाफ, अमोल सिंगनाथ, सुमित सोनकांबळे, अमोल गायकवाड, नदीम नदाफ, संकेत वडतीरे, अभी राठोड, अनिकेत माने यांच्यासह ४० युवकांनी प्रवेश केला. यावेळी तालुकाध्यक्ष शमशोद्दीन जमादार, राष्ट्रवादी उद्योग सेलचे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश सुरवसे, तालुका सरचिटणीस धीरज बेळंबकर, तालुका कार्याध्यक्ष शंतनु सगर, शहराध्यक्ष सुशील दळगडे, विद्यार्थी तालुकाध्यक्ष समर्थ सुरवसे, शहर कार्याध्यक्ष फय्याज पठाण यांच्यासह पदाधिकारी व युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.