आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिवादन:महात्मा गांधी विद्यालयात कार्यक्रम

परंडा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील महात्मा गांधी विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक रणजित घाडगे उपमुख्याध्यापक लोकरे, शिक्षक के.एन. पाटील यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते . यावेळी प्रशालेतील विद्यार्थ्यांनी भाषणे केली व प्रशालेतील सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख शिक्षिका ठाणाबीर यांनीही लोकशाही अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या जीवनावरील माहिती सांगितली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन कोकणे यांनी केले व समारोप लोकरे यांनी केला. याप्रसंगी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...