आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूमिपूजन:आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते कार्यक्रम; कोळसूर येथे विविध कामांचे भूमिपूजन

उमरगा14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील कोळसुर (गुं) व कोळसुर (क) ग्रामपंचायत अंतर्गत आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नांतून मंजूर असलेल्या विविध विकासकामांचे रविवारी (१२) सायंकाळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन व पाण्याच्या टाकीचा लोकार्पण सोहळा झाला. आमदार ज्ञानराज चौगुले, तहसीलदार राहुल पाटील, पंसचे सहायक गटविकास अधिकारी देवानंद वाघ, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे शाखा अभियंता पी. एस. कापसे, माजी सरपंच तथा उपतालुकाप्रमुख सुधाकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून व पाठपुराव्यामुळे कोळसूर (गुं) ग्रामपंचायत अंतर्गत २५/१५ योजनेतून गावांतर्गत सिमेंट रस्ता करण्यास दहा लाख, हायमस्ट व पथदिवे बसविण्यासाठी पाच लाख, सिमेंट रस्ता व गटार करण्यासाठी १६ लाख, यासह अन्य कामे मंजूर झाली आहेत.

शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नास प्राधान्य
आमदार चौगुले म्हणाले की मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतून उमरगा-लोहारा तालुक्यात एकूण १०० किलोमीटर अंतरावर शेतरस्ते मंजूर करून घेत शेतकरी बांधवांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्य देण्यात आले आहे. येणाऱ्या काळात शेतरस्त्यांचे जाळे निर्माण करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी दयानंद नगर तांडा येथील नागरिकांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्याकडे स्मशानभूमीची मागणी केली असता सात लाख निधीचे पत्र तत्काळ स्मशानभूमीस दिले.

बातम्या आणखी आहेत...