आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाचबिंदू आजाराचे लक्षण हे सहसा ओळखता येत नसल्याने रुग्णांनी वेळोवेळी तज्ञामार्फत नजीकच्या शासकीय आरोग्य केंद्रामध्ये उपचार करणे गरजेचे आहे असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. शिल्पा दोमकुंडवार यांनी जागतिक काचबिंदू सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम जिल्हा रुग्णालय यांच्या वतीने दि १२ मार्च ते १८ मार्च २०२३ दरम्यान LETS BEAT INVISIBLE GLAUCOMA या घोषवाक्यातंर्गत जागतिक काचबिंदू सप्ताह साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त्ा दि. १३ मार्च २०२३ रोजी नेत्र विभाग, येथे काचबिंदू सप्ताहाच्या उदघाटनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरवात डॉ.भालचंद्र यांच्या प्रतिमेचे पूजन करुन करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नेत्रशल्यचिकित्सक डॉ. महेश पाटील यांनी जागतिक काचबिंदू सप्ताह दरम्यान उस्मानाबाद जिल्हामध्ये नेत्रतपासणी शिबीरे, आकाशवाणी केंद्रावर मुलाखत, शालेय व महाविद्यालयीन स्तरावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार असल्याबाबत माहिती दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अधिष्ठात्या डॉ. शिल्पा दोमकुंडवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.आर.व्ही.गलांडे हे होते. यावेळी शासकिय वैद्यकीय महाविद्यालय, व रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ, तसेच नेत्रविभागाचे प्रमुख नेत्रशल्यचिकित्सक डॉ.वीरभद्र कोटलवाड, डॉ सुखदेव राठोड, डॉ.महेश पाटील,डॉ. मुस्तफा पल्ला, डॉ पवन महाजन, अधिसेविका सुमित्रा गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती तसेच नेत्रचिकित्सा अधिकारी बाळासाहेब घाडगे, रामराजे बिडवे, निलेश कुरील, नेत्रविभागचे इन्चार्ज वहिदा शेख सर्व नर्सिंग स्टाफ, समुपदेशक उमेश गोरे, रुग्णालयीन कर्मचारी, व रुग्णालयात तपासणी करिता आलेले रुग्ण व नातेवाईकांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आभार नेत्रशल्यचिकित्सक डॉ.वीरभद्र कोटलवाड यांनी केले तर सुत्रसंचलन संतोष पोतदार यांनी केले.
वयाच्या चाळीशीनंतर प्रत्येकाने तपासणी करण्याचे आवाहन
या वेळी अधिक्षक डॉ.तानाजी लाकाळ यांनी काचबिंदू होण्याचे कारण, काचबिंदू होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी, काचबिंदूचे समाजात वाढत असलेले प्रमाणे तसेच वय वर्ष ४० नंतर प्रत्येक व्यक्तीने व ज्या व्यक्तीला मधुमेह हा आजार आहे अशा व्यक्तीनी किमान सहा महिन्यातून एकदा तज्ञ डॉक्टरामार्फत डोळयांची तपासणी करुन घ्यावी , असे आवाहन याप्रसंगी बोलताना केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.