आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलसमाधी आंदोलन:पुनर्वसनात प्रकल्पग्रस्तांना सुविधा नाही, ग्रामस्थ उतरले प्रकल्पात, महिला बेशुद्ध

परंडा6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परंडा तालुक्यातील निम्नखैरी बृहत लघु प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्र पांढरेवाडी गावचे पुनर्वसन करुन नागरी सुविधांसह रस्त्याच्या मुख्य मागणीसाठी प्रकल्पग्रस्त शेतकरी, महिला व ग्रामस्थाच्या वतीने शुक्रवारी (दि.५) प्रकल्पाच्या पाण्यात उतरुन सामूहिक आंदोलन सुरु केले. आंदोलनदरम्यान एका महिलेच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने बेशुद्ध पडली. यावेळी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय सक्षम अधिकारी दुपारपर्यंत फिरकले नसल्याचा आरोप आंदोलकर्त्यांच्या वतीने करण्यात आला.पांढरेवाडी प्रकल्पग्रस्त गावातील संपूर्ण घर, जागा, जमीन क्षेत्र शासनाने सन १९९९-२००० मध्ये निम्नखैरी बृहत लघु प्रकल्पासाठी संपादित केली होती. शासनाने संपादित जमीन क्षेत्राचा मावेजा अनुक्रमे सन २००८, १०, व १२ मध्ये शेतकऱ्यांना वाटप केला.

महिलाही आक्रमक
पुनर्वसन होऊनही गावाला सुविधा नाही. वांरवार प्रशासनाला निवेदन देऊनही दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन सुरु केले असून यात महिलाही आक्रमक झाल्या. प्रकल्पासह गावातही आंदोलकांनी ठिय्या दिला होता.

महिलेवर रुग्णालयात उपचार
पांढरेवाडी प्रकल्पाच्या पाण्यात आंदोलन करताना सुमनबाई अजिनाथ भिल्लारे यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्या बेशुद्ध पडल्या होत्या. त्यांना तातडीने शेळगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून उपचार सुरु आहे.

इशारा देऊनही दुर्लक्ष
रस्त्याचे काम पुर्ण करावे यासाठी ग्रामस्थांनी यापुर्वी निम्नखैरी प्रकल्पाचे काम बंद पाडले होते. प्रकल्पग्रस्तांनी १८ जुलै रोजी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना नागरी सुविधा व रस्ता आदी त्वरीत कराव्यात यासाठी निवेदन दिले होते. मागण्याची पूर्तता न झाल्यास ५ आॕॅगस्ट रोजी सामुहीक जलसमाधी घेणार असल्याचा इशारा देण्यात आला होता परंतु शासनाने दखल घेतली नाही.

आता माघार नाहीच
शेळगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहनधारक, विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. रस्त्याचे काम करावे. रस्त्या विषयी ठोस निर्णय होत नाही; तोपर्यंत जलसमाधी आंदोलनातून माघार नाही.
प्रमिला शिंदे, प्रकल्पग्रस्त, पांढरेवाडी.

बातम्या आणखी आहेत...