आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्वासन:आंदोलनानंतर वीजपुरवठा सुरळीत करण्याचे  आश्वासन

टेंभुर्णी9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महावितरण कंपनीने थकीत वीज बिलासाठी शेती पंपाचा दोन दिवसांपासून वीजपुरवठा अचानक खंडित केला आहे. त्या पार्श्वभमीवर युवा सेनेचा वतीने महावितरण कंपनीसमोर ठिय्या आंदोलन पुकारल्याने चार तास वीजपुरवठा देण्याचे मान्य केले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. टेंभुर्णी विभागात शेती पंपाची २४० कोटी रुपये थकबाकी आहेत.टेंभुर्णी विभागात वीजेचा सर्वाधिक वापर होत असल्याने महावितरणच्या वरिष्ठांचा आदेश आल्यानंतर दोन दिवसापासून पूर्व सुचना न देता वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.

यामुळे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचे हाल झाले. माढा तालुका युवासेनेने जनावरांसह सकाळी दहा वाजता गेटवरती ठिय्या आंदोलन केले. यावेळी शिवसेना (ठाकरे) माढा तालुका प्रमुख मधुकर देशमुख, युवा सेनेचे जिल्हाधिकारी बागल, गणेश इंगळे यांनी आक्रमक पवित्रा घेतला.वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता उध्दव जाधव, अभियंता कुमार रस्तोगी यांनी आंदोलनाबाबत वरिष्ठांना कळवून चार तास वीजपूरवठा देण्याचे मान्य केले.

नंतर मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक किशोर देशमुख, उपजिल्हाधिकारी हर्षल वाघमारे, शिवसेना शहर प्रमुख सुरेश लोंढे, उपशहर प्रमुख संतोष खैरमोडे, प्रशांत सोनवणे, सतिश पवार आदींनी सहभाग नोंदवला. टेंभुर्णी विभागात शेती पंपाला जास्त मागणी आहे. परंतु मागणीपेक्षा वसुली कमी, शेतकऱ्यांनी कमीत कमी चालू दोन बिले भरली पाहिजे व सहकार्य केले पाहिजे थकीत वीजबिले न भरल्यास भारनियमनाला सामोरे जावे लागेल असे महावितरण अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...