आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाठपुरावा:महादेव मंदिर सभागृहासाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन ; निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही

मुरूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी शनिवारी (दि.१) मुरूम शहरातील किसान चौकातील जुन्या हेमाडपंथी महादेव मंदिरास भेट दिली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या माध्यमातून शासन स्तरावर पाठपुरावा करून सभागृह बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी शनिवारी (दि.१) या मंदिरास भेट देऊन जोड पिंडीचे दर्शन घेतले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या माध्यमातून शासन स्तरावर सभागृह व सभामंडपासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली. प्रारंभी किसान चौकातील नागरिकांच्या वतीने बापूराव पाटील यांचा ज्येष्ठ नागरिक तानाजी फुगटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी माजी प्राचार्य दत्ता इंगळे, माजी सैनिक व्यंकट चौधरी, बब्रुवान जाधव, सुरेश टेकाळे, नगर शिक्षण विकास मंडळाचे सचिव व्यंकट जाधव, माजी नगराध्यक्ष धनराज मंगरुळे, रशीद शेख, सोसायटीचे चेअरमन दत्ता चटगे, माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, माजी नगरसेवक सुरेश शेळके, वसंत सावंत, भगवान जाधव, सूर्यकांत पाटील, माधवराव इंगळे, फुलचंद फुगटे, अशोक जाधव, ज्ञानेश्वर चौधरी, प्रा. रवींद्र गायकवाड, गणेश अंबर, श्रीधर इंगळे, भगत माळी, देवानंद फुगटे, बबलू अंबर, रवींद्र जाधव, गणेश जाधव, बब्रुवान तरंगे, सुजित शेळके, राहुल वाघ, श्रीहरी शिंदे पाटील, गौस शेख, रजनीकांत वाघ आदींसह किसान चौक येथील नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...