आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबीराचे आयोजन:रथयात्रेच्या माध्यमातून आजपासून आयुर्वेदाचा प्रचार

उस्मानाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजाभवानी मंदिराच्या महाराद्वारापासून सुरू करण्यात येत असलेल्या प्रभा आयुर्वेद रथ यात्रेच्या माध्यमातून राज्यभर आयुर्वेदाचा प्रचार करण्यात येणार आहे. तसेच आयुर्वेदिक पद्धतीने तपासणीही केली जाणार असून या उपक्रमाचा शुभारंभ शुक्रवारी (दि. २) केला जाणार आहे. तुळजापूरच्या वीर तपस्वी मठामध्ये शुक्रवारी मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे व्याख्यानही होणार आहे. तुळजाभवानी मंदिराच्या महाद्वारातून प्रभा आयुर्वेद रथ यात्रेचा शुभारंभ तहसीलदार कोल्हे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

यानंतर ३५ जिल्ह्यात आयुर्वेद प्रचार व प्रसार होणार आहे, अशी माहिती वैद्य ऋतूराज कदम पाटील व वैद्य गजानन कुलकर्णी यांनी दिली. यावेळी रथयात्रेचे समन्वयक वैद्य दतात्रय दगडगावे, प्रविण जोशी, नरेंद्र गुजराती, रामदास आव्हाड, तूळजापूर डॉक्टर असोसिएशन, निमा तूळजापूरचे सदस्य, उपस्थित राहणार आहेत. यावेळी आयुर्वेद दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीचा समारोप वीर तपस्वी मठामध्ये होणार आहे. या ठिकाणी नागरिकांसाठी व्याख्यान होणार आहे. मोफत आयुर्वेदिक तपासणी शिबीर होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...