आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यात आयुर्वेद प्रचार व प्रसारासाठी प्रभा आयुर्वेद रथयात्रा काढण्यात आली आहे. त्याचा शुभारंभ येथील तुळजाभवानी मंदिर परिसरातून शुक्रवारी करण्यात आला.
शुभारंभानंतर शहरातून आयुर्वेद प्रचार दिंडी काढण्यात आली. मोफत रोगनिदान शिबिर घेण्यात आले. यामध्ये २२५ रुग्णांची तपासणी करण्यात आली. रथयात्रा शुभारंभ प्रसंगी पोलिस निरीक्षक काशिद, तुळजाभवानी देवस्थान कमिटीचे विश्वास परमेश्वर , रोटरीचे रविंद्र साळुंके, डॉ. मिलिंद कवठेकर , डॉ. प्रविण जोशी, डॉ. रामदास आव्हाड, डॉ. नरेंद्र गुजराथी, डॉ.ऋतूराज कदम, डॉ.गजानन कुलकर्णी, यात्रा समन्वयक डॉ. दत्तात्रय दगडगावे, लातूर संस्कृती फाऊंडेशनचे डॉ. बी. आर. पाटील, दिपरत्न निलंगेकर, तुळजापूर येथील डॉक्टर असोसिएशनचे सदस्य, वर्ल्ड स्कुलचे विद्यार्थी, आयुर्वेदिक महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक यांची उपस्थिती होती.वीर तपस्वी मठामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २२५ रुग्णांची तपासणी करून १५० जणांना पंचकर्म लाभ देण्यात आला. सात दिवसांची औषधे मोफत देण्यात आली. डॉ. रामदास आव्हाड यांचे व्याख्यानही झाले. डॉ. गणेश मलवाडे, डॉ. राजेश पवार, डॉ. नितीन धनोकार यांनी वैद्य व विद्यार्थी चर्चासत्रात मार्गदर्शन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.