आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:प्रचाराचे मेसेज, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप प्रमाणित करावे लागणार

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठावाडा शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी केले. तसेच प्रचारासाठी वापरण्यात येणारे मेसेज, व्हिडिओ, ऑडिओ क्लिप निवडणूक विभागाकडून प्रमाणित करून घेण्याच्या सूचना दिल्या.

औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी पत्रक, पोस्टर, बॅनरसह मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रचारासाठी वापरावयाचे प्रचार साहित्य प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

बातम्या आणखी आहेत...