आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:टिकैत यांच्यावरील शाईफेक हल्ल्याचा निषेध ; शेतकरी आक्रमक होतील असा इशारा

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांचे नेते राकेश टिकैत यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी दोषीवर कारवाई करावी अन्यथा देशातील शेतकरी एकजूट होऊन केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलने करणार आहेत. टिकैत यांच्यावर झालेल्या शाईफेक हल्ल्याचा राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध केल्याची माहिती शेतकरी नेते विनायकराव पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. शेतकरीविरोधी कायदे रद्द करण्यासाठी लोकशाही मार्गाने सलग एक वर्ष दिल्लीच्या सीमावर्ती भागात आंदोलन करत कायदे रद्द करण्यास भाग पाडले. टिकैत यांच्यावर सोमवारी (३०) बंगलोर येथे समाजकंटकांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. देशातील शेतकरी नेत्यांवर असे हल्ले होत असतील तर शेतकरी गप्प बसणार नाहीत. भाजपाने पाठी मागून हल्ले न करता समोरून हल्ले केल्यास शेतकरी केंद्र सरकारच्या या हल्ल्याला सामना करायला समर्थ आहेत. देशातील शेतकरी मतभेद, जात, पात राजकारण हे सर्व बाजूला ठेवून शेतकरी नेते टिकैत यांच्यासोबत आहेत. येणाऱ्या काळात शेतकऱ्यावर हल्ले झाल्यास देशातील शेतकरी स्वस्थ बसणार नाही.नेते टिकैत यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा शेतकऱ्यांच्या वतीने निषेध करण्यात येत असून दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी नेते श्री. पाटील यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...